पुरे!......

काही असावे  म्हणूंनी का , काही केलेच थोडे
इच्छाच  खूप आमची, पेंड खाईनाची घोडे

           व्यर्थ वल्गना त्या कशाला, राष्ट्र वैभवाच्या उराला 
          पुरलीत  थडगे जिथे, घोडा तेथेची  आडे

पुरे ती प्रजा रे,   पुन्हा पुरे तोची राजा
खोदू नका भूमीला, भार धारणीस  वाढे

          काळ वेडा स्वत:ही, फिरून तेथेच येतो
          डोंब भुकेचाच उसळे, इतिहास पाने फाडे 

उमग ह्या जगाची, आकळेल अलोक कशी रे तुजला
वासनाच जगी आताशा , हस्त मुखाशी झोडे