या खाण्यावर प्रेम करावे

या खाण्यावर या चरण्यावर शतदा प्रेम करावे

रुचकर उपमा, कांदा पोहे, असा असावा नास्ता
बोलता बोलता फस्त करावा घेऊन पुढील वास्ता
नास्ता आपुला रुचकर आहे खाऊन तो पाहावे ॥
भोजन असावे आपुले बरंका खूप ते स्वादिष्ट
बनविले असावे खास ते प्रियेने असावी नादिष्ट
हात आखडता न घेता, ते खूप चवीने चापावे ॥
अधून मधून असावा, एकादा पदार्थ हो मधूर
घ्यावी लज्जत त्याची संगे, असावी  भजी  चटकदार
मिळेल आनंद खाण्याचा, पण प्रकृतीस जपावे ॥
जेवणाचे आमंत्रण देतील, जे हो आनंदाने
जावे तिथे, खावे भोजन, खूप हो आवडीने
मिळतील विविध अस्वाद, चाखावयास ते पाहावे ॥
त्रूप्त व्हावे आपण, विविध पदार्थाच्या सेवनाने 
सार्थक होईल जन्माचे, स्विकारावे ते प्रेमाने
रुचकर पदार्थ असतील ते सतत आठवावे ॥