अरे मानवा

" अरे मानवा"
अरे मानवा मानवा |
नको करू सर्वनाश ||
धरा माय तुझी आज |
रडे पहा रात्रंदिवस ||१||
नाही पक्षांचा आवाज |
नाही नदीचा तो गाज ||
वृक्ष तोडी वरचेवरी |
नसे समतोल आज ||२||
करी तू आता विचार |
नाही गेला वेळ फार ||
टिकली हीं रानेंवने |
होई आनंदे संचार ||३||
पुन्हा बागडे हरीण |
सवे त्यांच्या पिल्लावळ ||
हिरवीगार कुरणे |
पाने फुले फळावळ ||४||
निसर्ग राजा डोलेलं |
आनंदाने हमखास ||
नांदेल रे पुन्हा सुख |
जगी मोठा भारतदेश ||५||
अनंत खोंडे .पुणे