ज्यांच्यापुढे झुकावे, दिसले असे न कोणी!

ज्यांच्यापुढे झुकावे, दिसले असे न कोणी!
आजन्म आठवावे, ठसले असे न कोणी!!

आयुष्य खर्च झाले, झाली न दिलजमाई;
रुसवा तुझा निराळा, रुसले असे न कोणी!

हृदयात झुळझुळावे स्वप्नील एक गाणे.....
आयुष्य दरवळावे, हसले असे न कोणी!

माझेच ओठ होते, माझेच दात होते....
इतकेच सांगतो मी, फसले असे न कोणी!

मागायच्याच आधी मी रक्त देत होतो!
जाईल प्राण माझा, डसले असे न कोणी!!

पत्त्यात कोणताही पत्ता हुकूम होतो!
मिरवू नकोस शेखी...पिसले असे न कोणी!!

हसतील आसवेही खुदकन क्षणात एका;
डोळे कधी कुणाचे पुसले असे न कोणी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१