प्रेमकहाणी

प्रेमकहाणी

वाटत होते त्यास पुसावे
त्याच्याकडे बघून हसावे
ओळख मनाची पटली
पण नजर नाही उठली

समज अन गैरसमज
काही पडेना उमज
दोष नव्हता कोणाचा
हा खेळ मनाचा

आणखी एक अधुरी कहाणी
आणखी एक प्रेमकहाणी
डोळ्यात तरळले पाणी
ओठांवर फुटली विरहगाणी

राजेंद्र देवी