" माझा नेता "
सोवळा हा माझा नेता
माझ्यासाठी झगडतो
नव्या नव्या योजनांचा
मलिदा तो सारा खातो॥१॥
सोवळा हा माझा नेता
बारमध्येसदा जातो
बारबाला संगे पाहा
कसा तेथे तो डोलतो॥२॥
सोवळा हा माझा नेता
करी ढोंगी पायपीट
शीण घालवण्यासाठी
घेई तो मदिरा घोट॥३॥
सोवळा हा माझा नेता
काय सांगू त्याचा थाट
गरिबाचे पैशातून
कमवी अनेक नोट॥४॥
सोवळा हा माझा नेता
नाही त्या कसला धाक
भ्रष्टाचार करूनी तो
भासवी मी अती नेक॥५॥
सोवळा हा माझा नेता
पाहू नका तुम्ही वाट
देवूनी मते भल्यांना
दावा त्या घरची वाट॥६॥
अनंत खोंडे
२६।११॥२०१२.