दोन मुक्तके

दोन मुक्तके
(उधळतोय!)
हृदयाच्या पडवीमध्ये किरणांचा वळीव आला!
अंधार प्रकाशामध्ये मनसोक्त अवेळी न्हाला!
अंधारच होता येथे, मी जन्म काढला तेव्हा;
आयुष्य संपले तेव्हा सूर्योदय येथे झाला!
..............................................................

दवडून वाफ तोंडाची मी उगाच वटवट केली!
सुकवून कंठ, डोक्याला मी माझ्या कटकट केली!
बदलले तसूभर नाही जन्मात कधीही कोणी;
जी करायची ती माझी दुनियेने फरफट केली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१