मरणे झकास झाले.!

रात्रीस चांदण्यांचे जत्थे उदास झाले
नव्हतीस तू म्हणुनी सारे भकास झाले.!
.
तो चंद्र पौर्णिमेचा ढाळीत अश्रू होता
पाहून त्यास सारे अंबर हताश झाले.!
.
उपमा किती दिल्या मी तुजला उदात्ततेच्या
गेलीस तू निघुनी अन स्वप्नंच खलास झाले.!
.
माझी कधीच नव्हतीस, समजाविले मनाला
माझ्या मनांस का हे खोटे आभास झाले.?
.
हरवून सूर सारे गाणे निघून गेले
आलाप सुरवेडे भलते उदास झाले.!
.
माझ्या मनांस वेड्या फसवून आज गेलीस
जगणे तुझे बघुनी सरड्याचे भास झाले.!
.
ऐसे तुला विसरलो हट्टास पेटुनी मी
तुझ्याच आठवांचे भोवताली फास झाले.!
.
गेलीस सोडूनी तू, आभार मानले मी
सुटलो जिण्यामधुनी, मरणे झकास झाले.!
.
-- तन्मय फाटक