तुझी याद येते जेव्हा फिरूनी...

तुझी याद येते जेव्हा फिरूनी

उरे सांजवेळ उदासी भरूनी....

थवे पाखरांचे परतून येती

नभी लागती आता चंद्र ज्योती

तुझी हाक यावी वाटे अजूनी....

कुठे कोण सजतो आहे फुलांनी

कुणाचा बहर निघाला सरूनी

तुझी याद राही हृदयी फ़ुलूनी....