माझ्यामध्ये तू असणं
एक साहजिक आहे
पण तू स्वतःमध्ये मला सामावणं
माझ्या जीवनाचे सार्थक आहे
तुझ्या निळ्या डोळ्यामध्ये
मी मलाच भेटतो नेहमी
आणी जाणतो
तू किती जपून ठेवलंय मला
आपल्या अंतर्मनी
तुझ्या पापण्यांच्या बंधनात
नेहमी अडकून राहावंस वाटत
माझे विश्व आता हेच आहे
हे मी आता जाणलं
आपल्या दोघांचे प्रेम
माझ्या जीवनाचे एक सत्य आहे
मी कितीही भरकटलो जरी
तुझं प्रेम त्याचा अंत आहे