"तो एक वृक्ष"

तो एक वृक्ष

तो एक वृक्ष आज गेला सुकून आहे |

हिरवीगार छाया आता कोठून आहे ||

छायेत रोज त्याच्या पहडुन झोप घेई |

आता नसे पांथिका विश्राम याच ठाई ||

आठवणी ह्या साऱ्या मनात जपून आहे ||१||

पक्षी बांधीत घरटे सुरेख फांदीवरी |

किलबिल पक्षांची मोहवी मना भारी ||

भग्न त्यावरी घरटे पहा पडून आहे ||२ ||

मोहून घेई सर्वा फुलुनी वसंतात |

शिशिरासम आज भासे पहा क्षणात ||

निसर्ग मानवावर आज रुसून आहे ||३ ||

अनंत खोंडे
२६|१२ |२०१२