टाकल्या माना फुलांनी पार आता!

गझल
टाकल्या माना फुलांनी पार आता!
एकमेकांचे पुरे सत्कार आता!!

चार दिवसांवर म्हणे आली दिवाळी....
या, चला सजवू पुन्हा अंधार आता!

हे ऋतू हट्टी तरीही ‘हो’ म्हणाले!
राहिले बाकी तुझे होकार आता!!

वाकलो माझ्याच ओझ्याने अरे मी....
हे पुरे झाले तुझे उपकार आता!

चालले काही न माझ्या प्रार्थनेचे;
तू नको काही करू उपचार आता!

मी कधीचा पार गेलो पैलतीरी!
तू कराया सांगतो संसार आता!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१