तुला पाहून मदिरेचा रिकामा झिंगला प्याला!

तुला पाहून मदिरेचा रिकामा झिंगला प्याला!
पिण्याआधीच बोभाटा पिण्याचा केवढा झाला!!

कुणाची चाल ती होती? कुणाचा खेळ तो होता?
असो काही, अता माझा, जिण्याचा फैसला झाला!

बहरण्याचा तुम्हाला घ्यायला लागेल परवाना....
तसा बागेत ह्या यंदा फुलांनो कायदा झाला!

उगवला सूर्य ह्या अंधारल्या वस्तीतही अंती!
कुणाचा त्यामधे तोटा, कुणाचा फायदा झाला!!

कधी मी शोधले त्याला, कधी मज शोधले त्याने....
कधी परक्यापरी माझा किनारा चालता झाला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१