" नेता कसा"
नका विचारू नेता कसा ।ध्रु॥
नेता असे हो 'भाव'जसा॥
भाऊ कुणी म्हणती नेत्याला ।
कोणी म्हणती दादा त्याला ॥
विविध रूप हे" या नेत्याचे"२
" सर्व स्तरावर दिसे ठसा२"॥१॥ध्रु॥
ढंग तयाचा दिसे लोचना ।
कर्म तयाचे क्लेशवी नयना ॥
" दिसे कधी का कुणास सांगा"२
फिरतांना तो पायी असा ॥२॥ध्रु॥
जनतेमुळे त्या पद लाभले ।
करी घोटाळे तो भले भले ॥
" गुळास मुंगळा बिलगून जैसे"२
चिकटून पदाला बसे तसा ॥३॥ध्रु॥
अनंत खोंडे.
१८।१।२०१३.