नको उसळूस तू हृदया, तुला झेपायचे नाही!
तिचे साधेसुधे बघणे तुला सोसायचे नाही!!
फुलांचा एकमेकांचा अबोला बोलका असतो!
तुला गंधातले, रंगातले समजायचे नाही!!
तुझी माझी पुन्हा चर्चा कराया लागले तारे....
कितीही मी जरी म्हटले अता बोलायचे नाही!
समुद्री दोन डोळ्यांच्या किती भंडावती लाटा;
किनारी थांबणाऱ्याला कधी उमगायचे नाही!
दिले पहिल्याच भेटीला तुला काळीज मी माझे!
अता तू बोल काहीही मला टोचायचे नाही!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१