बावळी

बावळी

डोळ्यात तिच्या वसे
मूर्तं ही सावळी मूर्तं ही सावळी
का म्हणती राधेला
लोकं ही बावळी लोकं ही बावळी

वाजवी वेणू वनमाळी
रोज वेळी अवेळी सांज सकाळी
आपुल्याच नादात डोले
राधा ही बावळी राधा ही बावळी

नाही दिसता कान्हा
सैरभैर झावळी सैरभैर झावळी
वाट पाहे कदंबाखाली
राधा ही बावळी राधा ही बावळी

राजेंद्र देवी