आई ..

ठेच लागता घाई घाई, 
तोंडी नेमके आई आई ..
दु:खामधे मुखात येई
कसे नेमके आई आई ..
तळमळ जेव्हां जिवात होई 
मनीं नेमके आई आई ..
समर प्रसंग सामोरी येई
स्मरण नेमके आई आई ..
बापाचा पाठी मार खाई 
तोंडी नेमके आई आई ..
जन्म माणसा वाया जाई 
म्हटले ना जर आई आई !
.