माहीत नाही
तू मला पाहिले नाही असे नाही
पण तू नजर फिरवलीस
माहीत नाही तू
कोणाच्या आठवणीत हरवलीस
तू बोललीस माझ्याशी
शब्द पण प्रामाणिक होते
माहीत नाही
ते कोणाच्या तोंडचे होते
तू सोडून मज गेलीस
आठवणी पण गडद होत्या
माहीत नाही
तुला का त्या न कळत होत्या
राजेंद्र देवी