शाश्वत

 मी नवीन आहे त्यामुळे चुका होतात थोडं सांभाळून घ्यावं.
शाश्वत
काही घडते काही काही झडते
काही मिळते नवे नवलाचे
श्वास चालू राहतो आपोआप
तसे चालणे असावे पावलांचे

कमी असावी हाव
मंद करावी धाव
मरण्याआधी थोडासा मिळावा ठहराव

खोलवर जातत मुळे
दूर नसतोच मग शांतीचा स्वर्ग
संपल्या सगळ्या वाटा तरी
आपलाच आपण शोधायचा मार्ग

यशाचे शिखर आभाळ नाही गाठत
दुसऱ्यांचे सुख काळजाला नाही भिडत
अंतिम सत्य असे नसतेच काही
जो तो आपले दुःख साही
***
सावित्री