स्फुट शेर (प्रासंगिक)

स्फुट शेर (प्रासंगिक)
खूळ घ्यायचेच खूळ लागले मला!
चौकटीत राहणे पसंत ना मला!!
..............................................................
तोबऱ्यामुळेच तोंड चरबटे किती!
खळखळून एक छान टाक चूळ तू!!
...........................................
उंच हा बकूळ,  ठेंगणाच मोगरा!
कोणतेच फूल माझिया न जोगते !!
..........................................................
तडकशील तूच अन् कळेल हे तुला.....
काच मी दिसावया तरी अभेद्य मी!
............................................................
दगड एक मार अन् दिसेल मी कशी....
हे तुला कळेल की, किती गढूळ मी!
.............................................................
चौकटीतली नव्हे तुम्हासमान मी;
कोणत्या कुळात मी, मला न माहिती!
..............................................................
कागदी असेल पण, त्रिशूळ घेतला!
मारते कुणाकुणास ते तरी पहा!!
.............................................................
व्योम व्यापणार मीच, चंग बांधला!
शायरीतली जरी असेल धूळ मी!!
..............................................................
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१