हे नशिबा

हे नशिबा..

हे नशिबा
का खंतावुनी सोडलेस मला
कधीच नाही फुललासी
प्रारब्धाच्या फुला

अपेष्टांचा भडिमार
अन हलाखीचे जिणे
कोठे नेऊन सोडेल
मला माझे पिणे

डळमळते आयुष्य माझे
त्यात आठवणी विफल
आता परिणाम करेनासे झाले
हलाहल

राजेंद्र देवी