आता मी ठरवलय की
बांधायचा काळजाला 'बायपास' करणारा
एक रस्ता म्हणजे भविष्यात
टाळता येईल भावनांची कोंडी,
कमी होईल आसवांची गर्दी,
आणि मुख्य म्हणजे
काळजीने वाया जाणारे काळजाचे ठोके वाचल्याने
मूल्यवान इंधनबचत होईल!
आणि काळजाची लुडबुड कमी झाल्याने
मेंदूपासून जाणार्या सर्व आज्ञा लवकर पोचतील आपल्या गंतव्य स्थानावर
आणि मी अधिक कार्यक्षम!
फक्त त्या काळजाने टोल-बिल लावून राजकारण करू नये एव्हढंच!
------------------------------- जयन्ता५२