आताशा

तुल कधी येईल दया का

बघत रहतो मी
उधार, उसन्या श्वासांवरती
जगत रहातो मी..
कुठे, कसे शोधावे तुजला
हरवून गेल्या वाटा
नभात तुटलेल्या पंखांनी
उडत रहातो मी..
आयुष्याच्या वणव्यामध्ये
करपून गेले जगणे
तुझ्या चंदनी आठवणींनी 
जळत रहतो मी..
कधी लपुनी रहात नव्हते
दोघांचे सुख, दुःख
अता कुणी समजावत नाही
रडत रहातो मी..
तु असताना वेदनेसही
होता स्पर्श सुखाचा
अता सुखाच्या स्पर्शनेही
कुढत रहातो मी..
गर्भरेशमी शेला मीही
पांघरलेला होता
नात्यांचे विरलेले धागे
विणत रहातो मी..