वठलेल्या तरूतळी मी सावली शोधतो आहे!(तस्वीर-तरही गझल)

तस्वीर-तरही गझल
वठलेल्या तरूतळी मी सावली शोधतो आहे!
स्मरणांच्या लाटांमध्ये मी निवांत भिजतो आहे!!

मी खोल खोल गेलेला एकाकी आडच आहे!
पोहरा रिकामा वरुनी मजकडे पाहतो आहे!!

तो रस्ता अजून दिसतो! पण, जातो कुठे कळेना.....
झालीस दिसेनाशी तू....मी मात्र चालतो आहे!

अद्याप आठवे मजला तो वर्ग बालवाडीचा....
मी तसाच बसलो आहे! मज कुणी शिकवतो आहे!

या तारांगणात होतो, एकटाच तारांकित मी!
मी तुटलेला तारा अन् तू मला शोधतो आहे!!
-
------प्रा.सतीश देवपूरकर
 भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
 नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
  फोन नंबर: ९८२२७८४९६१