शेअरिंग .....व्हॅलेंटाईन निमित्त
एकमेकांचा हात हाती धरुन, सात पावलं चालल्याला कैक वर्षे झाली ......
तरी ही....
छान कविता वाचल्याबरोब्बर तुझी आठवण का येते ?
आणि तुलाही असंच काही भावलं मनापासून की माझी आठवण का येते ?
सुरेल गाणं, ह्रदयद्रावक प्रसंग, ..........
अशी किती कारणं देणार एकमेकांना आठवण्याची ?
.
.
आनंद असो वा दु:ख ....
"शेअरिंग" करायला कोणीतरी साथीदार हवाच की ?
नाही तर ते बिचारं एकुटवाणं "ब्रह्म" तरी कशाला आलं द्वैतात
"एकोSहं बहुस्याम् " म्हणत.......
"शेअरिंग" साठीच ना !!!!.......दुसरं काय ?
Happy Valentine.............