निघाली खाशी हो स्वारी ...

निघाली खाशी हो स्वारी
दुष्काळी त्या दौऱ्यावरी
संगे घेउनिया  लवाजमा
 फौजफाटाही  तो भारी 

तिकडे नाही की पाणी
कोरड्याच साऱ्या  विहिरी
संगे घेउनिया  बिस्लेरी 
ट्रकमधे भारी भारी 

 खाण्याला नाही बाजरी  
ना दाणा ना भाकरी
संगे घेउनिया  कारभारी
कुशल सैपाकी आचारी

डोईवर छत्री ती धरी
सोबतचा  चमचा कुणीतरी
संगे घेउनिया गालीचा
पायघडी ती कुणी अंथरी

निघाली खाशी ती  स्वारी
पहा हो विमाने ती वरी
संगे घेउनिया सामग्री
दुष्काळी त्या दौऱ्यावरी !

.