(सारा हिशेब द्यावा लागेल एक दिवशी)

सारा हिशोब द्यावा लागेल एक दिवशी!
व्यवहार बेहिशेबी, धंद्याची केली काशी!!

नुसती बिले कशी ही? पेमेंट कोण करणार? 
छापली घरी का?  बघ आठवून  स्वतःशी!

वायाच गेला पैसा, शिमगाकी ही दिवाळी?
इन्कमटॅक्स फौज, उगवेल एक दिवशी!

आहे अशाचसाठी दारी तुझ्या ही रांग
उघडेल नशीब त्यांचे नक्कीच एक दिवशी!

स्टोरी तुझी उद्याला गाजेल एवढी की,
फोटोच जागोजागी दिसतील एक दिवशी!

आधी विचार कर, मग दे चेक तू एकेका!
इतमाम शासकीय लाभेल एक दिवशी!!

भलत्याच लागल्याकी सवयी घरातल्यांना!
आता कसा पुरवठा पडणार  हरेक दिवशी!!