तिचे पाहणे पाहणा-यास जाळी!

गझल
तिचे पाहणे पाहणाऱ्यास जाळी!
तिच्या लोचनी खंजिराची झळाळी!!

फुले वेचताना उभी ओणवी ती....
जणू वाटते  वाकलेली डहाळी!

जशी सांज झाली, तशी ती म्हणाली....
अता वाट माझी तुझी निरनिराळी!

तिची वाट बघण्यात आयुष्य गेले.....
तिची फक्त झाली क्षणाची टवाळी!

अता वेदनांनो पडू द्या जरासे;
भले या उद्याला सकाळी सकाळी

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१