गझल
आले कशीबशी मी चुकवून या जगाला!
बघतील ही फुले अन् होईल बोलबाला!!
जे सांगता न आले, नजरेत बोलले मी....
साधासुधा प्रिया तू, मीही अजाण बाला!
दुनियेस या भलेही वाटो निरर्थ प्रीती;
तू भेटताच आला ह्या अर्थ जीवनाला!
बुडले तुझ्या मिठीच्या डोहात एवढी की,
हा रोमरोम माझा बेहोष पार झाला!
गेल्या घरी कधीच्या परतून पायवाटा.....
ही पायपीट उरलीसुरली करू उद्याला!
झाल्या बऱ्याच गप्पागोष्टी, चला, निघू या!
येथेच, ह्याच वेळी, भेटू पुन्हा उद्याला!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१