नस्ती विवंचना !!
कवितेत त्यांच्या नेहेमीच वसंत मस्त फुललेला
मला सतत काट्यांचा घोर का लागलेला ??
असतात तिथे फुले-बागा छान छान सजलेल्या
दिस्तात मला झोपडपट्ट्या घाणीने भरलेल्या !!
उंची कपडे, बंगले-गाड्या, बीचवरती संध्याकाळ...
सिग्नलपाशी चेहरा कुट्ट हावभरला सदाकाळ !!
जगात त्यांच्या एकूणएक मस्तीतच गुरफटलेला
मीच एक करंटा नस्त्या विवंचनेत पडलेला .....