केव्हातरी...
रेड्याने वेद म्हटला होता
मग कदाचित गाढवालाही कळेल
गीता थोडीतरी
अहकारापुढे खरे प्रेम फळेल
केव्हातरी...
सुंभ जळतो तर
पीळही जळण्याची धरुया आस
बदलणे हे जिवंतपणाचे लक्षण तर
निर्जीवतेलाही फुटतील अंकुराचे घोस
केव्हातरी...
पाण्याच्या झऱ्याने तडा
जातो कडेकपारीला
फुटेल गहीवर
कोरड्या कठोरतेला
केव्हातरी...
सावित्री