"शक्यतेच्या परिघावरून"" हा माझा कविता संग्रह पूर्ण झाला आहे.
गेल्या दोन तीन वर्षातल्या माझ्या निवडक कविता यात आहेत. 'उत्तराखंड' नावाची एकाच वृत्तातली एक दीर्घ कविता लिहितांना खूप धमाल आली हे आवर्जून सांगावेसे वाटते.
इतर जवळजवळ सर्व कविता मुक्तछंद आहेत. आजचे जीवन, स्मरणरंजन, आभासी विश्व, सामाजिक स्थिती, व्यक्तिगत आयुष्यातले यश -अपयश, प्रेम -विरह व त्याचे होणारे एकत्रित परिणाम अशा अनेक विषयांना या कविता स्पर्श करतात. सभोवताली असणाऱ्या अनेक संधी, अनेक शक्यता वास्तवात येत नाहीत. काही येतात. काही कालांतराने दूर जातात. अशा सर्व आंदोलनांचे वर्णन करणाऱ्या या कविता आपल्याला आवडतील अशी आशा करते.
महाराष्ट्रात असलेल्या सर्वांना याची मुद्रित प्रत मागवता येईल. याचे ई-बुक साहित्यसंस्कृती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपल्या प्रतिसादांचे स्वागत आहे.
धन्यवाद