पिले खेकऱ्यांची

भाषाः आग्री, मराठी

पिले खेकऱ्यांची रेतीत गारती ठसा आपला
पिले मानसाची मातीत गारती वसा आपला
नसे माहिती बाहेरील नव-नव्या जगाची तरी
पिले बेरुकाची उगा फारती घसा आपला
मना ना शिकायचे मंग रोज तीच साला क ला?
पिले गारवाची सांबालतीच वारसा आपला
दुपारीच काचेटी बोलते निराश भाषा जनू
पिले सूरयाची ती शोधतान कवरसा आपला
शिरीमंत होला, रातीन झेतला बयाना अता
पिले कासवाची बघ सांगती नाव सस आपला
काचेटीः आभाळ, मळभ