सत्संगती
श्वासोच्छ्वासी नाम । जपे सर्व काळी । वारी ही आगळी । साधे ज्याला ॥
न लगे जावया । अन्य पुण्यक्षेत्री । अवघी धरित्री । तीर्थरुप ॥
व्यापूनिया चित्ती । नित्य समाधान । वाटे धन मान । तृणवत ॥
अंतरी संतत । ध्यातो भगवंत । होय मूर्तिमंत । संत भला ॥
लाभावी अशांची । नित्यचि संगती । याविण विनंती । नाही दुजी ॥
(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण )