पोशिंदा
थंडी वाऱ्यात
उन पावसात
पाणी करून रक्ताच,
राबायच आम्ही
आलेल पीक
येईल का नाही
सुरक्षीत हातात ?
काळजीत या
झुरून तिळ-तिळ,
मरायच आम्ही
बाजारात,
मोत्याच्या राशीला
मिळते जी काही
चवली-पावली
समजून प्रसाद तिला
मुठीत घट्ट पकडुन,
ठेवायच आम्ही
त्याच्याच जोरावर
राखेतून सन्साराच्या
फुलनार हिर्व स्वप्न
पुन्हा-पुन्हा,
पहायच आम्ही
त्याचच करायच
इतरानि भांडवल
अन शेतकरी धर्माच्या
जीर्ण शेल्यात
फासळ्या दडवून
स्वतःलाच पोशिंदा,
म्हणायच आम्ही......!
_उद्धव कराड (मो. न.९८५०६८३०४५)
मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.