झंझावात

झंझावात

आठवणींचा झंझावात
मनाचा पाचोळा
भिरभिरतसे
कसे करू मी गोळा

तापल्या मनावर
डोळ्यातला वळीव
सुगंध दाटतो
जसा ग्रीष्मातला वाळा

गेली दूरवर सोडून
हळूच टिपतो नयन
सांगतो जनास
डोळ्यात धुळीचे अंजन

राजेंद्र देवी