भरून येईल आभाळ दाटून येतील मेघ
बुडून जाईल अंधारात जेव्हा सारं जग
तेव्हा तू एक कर.......
माझा हाती हात धर.......
चिंब चिंब पावसात बीज भिजून जातं
झाड बनून मातीतून रुजून येतं
तसंच.... अगदी तसंच
मलासुद्धा तुझ्या मायेत चिंब चिंब भिजू दे
तुझ्या छायेत रुजू दे
फक्त तू एक कर......
बरसून येऊ दे...... तुझ्या मायेची सर..
वैशाखात तुझं प्रेम
सावली होतं....
पानझडीत तुझं प्रेम
पालवी होतं....
उधाणलेल्या सागरात ही
जीवन नौका तरून जाते.....
वळण वेडी वाट सुद्धा
क्षणामध्ये सरून जाते.....
जर तुझी सोबत असेल तर....
म्हणून तू एक कर माझा हात हाती धर.....