आई (कविता)

                    आई

खळखळत्या पाण्याला
द्यावं वळण,
कवेत घेउन
आई तो किनारा,
शिण भरल्या अंगानं
विसवावं,
दाट सावलीत
आई तो निवारा,
बोचऱ्या थंडीमध्ये
उबवावं,
कोवळ्या सूर्यकिरणांनी
आई ति उबारा,
भणभणत्या मनाला
पाजावं,
शांतीचं तीर्थ
आई तो गाभारा,
मांजरीच्या दातांनी
लावावं,
संसारास पिलांना
आई तो विश्वकर्मा,
सुखी प्रपंचासाठी
दिसावा,
सन्मार्गच लेकरांना
आई तो सुरमा,
पिढी दर पिढी
यावं,
मुर्त रुप संस्कारांना
आई ते देउळ,
सावलीत पदराच्या जिच्या
दिसावं,
पुन्हा शैशव आपलं
आई ते राउळ......