मधुगंध...

मधुगंध...

तुला आठवणे हा
माझा छंद आहे
वावटळीत दरवळणारा
हा मधुगंध आहे

उलगडताच पदर मनाचे
मी सैरभैर झालो
आठवणीत तुझ्या
मी सचैल न्हालो

शब्द सारे तुझे अबोल
गीतं माझे झाले
ऐकताच का तुझे
डोळे ओले झाले

राजेंद्र देवी