गझल
मी बोललो काही जरी, होतात का ही भांडणे?
कोणासवे आलीच ना करता मला संभाषणे!
होतो अमावस्याच मी! तू भेटण्यापूर्वी मला;
वाट्यास आता रोज येते पौर्णिमेचे चांदणे!
जे व्हायचे ते जाहले, इतिहास झाला एक तो.....
मी शोधतो आहे उगाचच कारणांची कारणे!
मी एक आहे तार हृदयाच्या सतारीची तुझ्या......
स्पंदन तुझे पण आत माझे चालले झंकारणे!
या माणसांमध्ये, पशूंमध्ये फरक ना राहिला!
कोणी पहातो गुरगुरोनी, तर कुणाचे भुंकणे!!
या पर्वतांच्या या नद्यांच्या कोण सीमा आखतो?
या सागराला, या नभाला तोच घाली कुंपणे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१