ओझेवाली
गर्भारपणी उदरात,
जन्मल्यानंतर
आंगण थोडे करेपर्यंत
अंगा-खांद्यावर,
शिक्षणापासून ते
प्रपंचाला लागल्यानंतरही
आजन्म,
कृतकृत्य होउनी
मनावर,
आमचं ओझं तू
मिरवायचंस आई,
आन्,
आम्ही मात्र
गरज संपल्यावर,
अडगळीत टाकून तुला,
ठरवायचं निव्वळ......
.... ओझेवाली...!!...???
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.