पालखीचे भोई
नकोत नुसते इमले
सुबक कलाकृतींचे,
तरंग जनसागरातले
जिवंत करू या,
माणसातल्या माणसाला
चला श्रिमंत करू या,
झाले किती सैरभैर जिव
जिवनास वैतागलेले,
दिप त्यांच्यात नव्याने
आशेचे चेतवू या,
जगता जगता आपण
जगण्यातला त्यांच्या
चला अर्थ होउ या,
बेबंद होउनीया
हैदोस किती घालती,
कोरड्यांनी शब्दांच्या
जाणिवेस त्यांच्या जागवू या,
मोकाट त्या वारुंचे
आपण लगाम होउ या,
पाषाणांची ईथे मांदियाळी
निर्झर आत दडलेले,
फोडण्या पाझर तयांना
दास माणुसकीचे होउ या,
नसलो जरी संत आपण
भोई त्यांच्या पालखीचे
होउ या....
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.