नाही घेत आम्ही गगनास कवेत आता

नाही घेत आम्ही गगनास कवेत आता 
नाही उरला श्वास आजच्या हवेत आता 
लाख सुखांचे चेहरे, 'जरी' पांघरून झाले 
मनापासून जगण्याचा नाही बेत आता !!
ऐकले कितेक धर्मांची पारायणे आम्ही 
परीक्षा नाही विषाची आम्ही घेत आता 
आली जाग पण जरा उशिराच आली 
त्या झोपडीतून धूर नाही येत आता 
कोण जाणे अंधारात जखमांचे काय झाले 
धुंद झालोत आम्ही दुःखाच्या नशेत आता 
उगवले, जे कधी पेरले नव्हतेच आम्ही 
आज कुंपणाच ओझ सोसत शेत आता