अभिलाषा (कविता)

    अभिलाषा

मी सांगू कशा कुणाला
माझ्या यातना
मनाशीच बोलतो
मनीच जपतो
मी माझ्या वेदना
आशेच्या धगधगत्या
निखाऱ्यावरती
जाळून टाकतो निराशा
राखेतून तिच्या
जन्मते पुन्हा
भंगल्या स्वप्नांची
अभिलाषा
एक थेंब हर्षाचा
एक थेंब दुःखाचा
डोळे सदा पाणावलेले
ओल्या-ओल्या डोळ्यांना
दिसेचना
गांव ते मुक्कामाचे
आहे धुक्यात दडलेले..!
                                -उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
                                  मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.