कोवळी सकाळ
क्षितीजी लाली
गुलाली उधळली
पहाट वाऱ्याने
चुंबीत फुले
कुपी अत्तराची
शिंपली
सारीत पडदा धुक्याचा
धरेवरी उन्हं
सोनेरी सांडली
सुस्तावल्या रानाला
सावल्यांच्या संगे
हलकेच जाग आली
कलरव कुठे
पाखरांचा, कुठे
औतकऱ्याची ललकारी
पाना-पानातून
हिर्व्या रानातून
घुमते मध्येच
हिर्व्या राघूची शिळ
पांदी-पांदीतून
गवत-फुलांतून
खेळतो रास जसा
घननिळ..
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.