आठवणी

आठवणी

उणीवांच्या राज्याची
तू राणी
तिन्ही काळ
डोळा पाणी

चुकलेला ताल
उदास महाल
बेसूर तंबोरा
जीर्ण गवसणी

अपेक्षित तू
उपेक्षित मी
सापेक्ष या
तुझ्या आठवणी

राजेंद्र देवी