घर एक हायकू

आता ते घर
आपली वाट कधी
नाही पाहत

तसे तर
कुणी कुणाच नाही
रस्त्यावर

हवे छप्पर
थंडीत अंगावर
जाड  चादर

आणि मिळावे  
घास दोन उन
घ्याया गिळून
 
प्रेम ना पण
शाबूत व्यवहार
तिचा माझा

दु:ख रुमाली
भिजल्या वाचून 
गेले फाटून

होता बहाणा
जरा खेचणे ते
नव्हत्या गाठी

विक्रांत प्रभाकर
दुवा क्र. १