संस्कार नाचती नागडे, अंगास झोंबते का लाजही?
आवाज कोवळा मार्दवी, खोटेच सांगते का गाजही ।
वाटेत वाटले पुण्य मी, नाहीच कोणती ईच्छा अता
छाटून टाकल्या वासना, फुटतात कोंब ते का आजही ?
निर्वस्त्र रोज धनाढ्यही, लक्ष्मीच लाळघोटी चंचला
ती शारदाच फड मांडते, गरिबीत नांदते नाराज ही
दाहीदिशाच अंधारल्या, सामान्य नाडला गेलाच तो
चांडाळ पावलोपावली, गाडेल पांग ते का आजही ?
बेकायदा सदा वागणे, वाह्यात कल्पना चेकाळत्या
विश्वासपात्र ती सोवळी, व्यक्तीच सांडते हा बाजही