दिवा म्हणे

ऊब उजेडाचे
देता देता दान
दिवा घेई पूर्ण
ऊर्जारूप ||१||

विझताना मग
मन सैरभैर
आला पैलतीर
दिवा म्हणे ||२||

फक्त पेटण्याचा
क्षण विलक्षण
बाकी होते गौण
दिवा म्हणे ||३||