मागणे

निरर्थांचे बुरखे फाटलेला
शब्द कळूदे

अर्थांची वस्त्रे फेडलेला
शब्द कळूदे

अक्षरांची शरीरे त्यागलेला
शब्द कळूदे

कळूदे म्हणजे काय
तेही कळूदे